Screen Time: स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी नवीन वर्षात काय करावं?
Lifestyle Dec 23 2024
Author: vivek panmand Image Credits:fb
Marathi
ठराविक वेळेची मर्यादा ठेवा
रोजच्या स्क्रीन वापरासाठी वेळेची मर्यादा ठरवा, जसे की फक्त 2-3 तास मोबाइल आणि लॅपटॉपवर स्क्रीन टाइम ट्रॅकिंग अॅप्स वापरा.
Image credits: fb
Marathi
स्क्रीन फ्री वेळ ठरवा
दररोज विशिष्ट वेळेसाठी (उदा. रात्रीचे जेवण किंवा झोपण्याच्या आधी) कोणत्याही स्क्रीनचा वापर करू नका. "स्क्रीन-फ्री झोन" तयार करा, जसे की बेडरूम किंवा जेवणाचा टेबल येथे करावा.
Image credits: fb
Marathi
डिजिटल डिटॉक्स दिवस ठरवा
आठवड्यातून एक दिवस डिजिटल डिटॉक्ससाठी ठेवा, ज्यादिवशी स्क्रीनचा वापर कमी करता येईल. या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवा किंवा बाहेर फिरायला जा.
Image credits: fb
Marathi
झोपण्याआधी 1 तास स्क्रीन टाळा
झोपण्याआधी स्क्रीनकडे पाहणे टाळा, कारण यामुळे झोपेचा दर्जा खालावतो. याऐवजी पुस्तक वाचा किंवा ध्यानधारणा करा.
Image credits: fb
Marathi
सूचना बंद ठेवा
सोशल मीडिया किंवा गेमिंग अॅप्सची अनावश्यक सूचना बंद करा. यामुळे तुमचा सतत स्क्रीनकडे पाहण्याचा मोह कमी होईल.
Image credits: fb
Marathi
कामासाठी विशिष्ट वेळ ठेवा
जर कामासाठी स्क्रीन वापरणं आवश्यक असेल, तर काम संपल्यानंतर लगेच स्क्रीन बंद करा. स्क्रीनसाठी "Work Only" वेळ ठेवा.