चाणक्य नीतीत नातेसंबंधांवर अनेक मौल्यवान विचार दिले आहेत. त्यांनी नातेसंबंधांचे महत्त्व, कसे निभवावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
स्वार्थी व्यक्ती स्वतःच्या फायद्याचा विचार करतात, ते तुमचं भलं कधीच करू शकत नाहीत. चाणक्य सांगतात की स्वार्थी लोक फक्त गरज असेपर्यंत तुमच्यासोबत राहतात. अशा लोकांपासून दूर राहावे.
ज्या ठिकाणी विश्वास नाही, ते नाते टिकत नाही. विश्वासाशिवाय कोणतंही नातं केवळ तडजोड ठरते. चाणक्यांच्या मते नात्याचा पाया विश्वास असतो. विश्वास गमावला, तर त्या नात्यात अडथळे येतात.
'गुपित हे गुपितच ठेवा. तुमच्या जवळच्या नातलगांनाही गुप्त गोष्टी सांगणं टाळा. चाणक्यांच्या मते, आपली गोपनीय माहिती फक्त स्वतःजवळ ठेवावी.
मित्राची निवड योग्य प्रकारे करा, कारण मित्र जर चुकीचा असेल, तर तो शत्रूपेक्षा जास्त हानी करू शकतो. चाणक्य म्हणतात की मित्र निवडताना खूप काळजी घ्यावी. एक चांगला मित्र आयुष्य बदलतो.
नम्रता हे नात्याचं खरं सौंदर्य आहे. अहंकार नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो. चाणक्य नम्रतेला नात्यांमध्ये फार महत्त्व देतात. अहंकारामुळे नाती तुटतात तर नम्रतेमुळे नाती मजबूत होतात.
जर एखादं नातं तुम्हाला सतत दु:खी करत असेल किंवा हानी करत असेल, तर ते नातं तोडून टाका. चाणक्यांच्या मते, प्रत्येक नातं आपल्याला आनंद आणि शांती देणारं असायला हवं.
तुमचं वागणं आणि शब्द सर्वांशी नम्र असावेत, कारण वाईट शब्द नात्यांमध्ये कटुता निर्माण करतात. चाणक्य सुचवतात की प्रत्येकाशी सौम्य शब्दात बोललं पाहिजे.
काही नाती मर्यादित ठेवावीत. खूप जवळीक कधी कधी नुकसानकारक ठरते. चाणक्य यांना वाटतं की नात्यामध्ये मर्यादा ओळखून वागणे महत्त्वाचे आहे, कारण खूप जवळीक कधी कधी समस्यांना कारणीभूत ठरते.
चाणक्य नीतीत नातेसंबंधांचा गाभा विश्वास, नम्रता, आणि संयम असल्याचं सांगितलं आहे. योग्य नाती निवडणं त्यांचं जतन करणं व विषारी नात्यांपासून दूर राहणं हे जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे.