Marathi

चेनचं सौंदर्य वाढवणारे सोन्याचे लॉकेट्स!

सोन्याच्या चेनला साजेसे आणि तिचं सौंदर्य दुप्पट करणारे काही खास लॉकेट डिझाईन्स आपण येथे पाहणार आहोत.

Marathi

श्रीकृष्णाच्या डिझाईनचं लॉकेट

या गोल आकाराच्या लॉकेटमध्ये मध्यभागी श्रीकृष्णाची मूर्ती आहे. आजूबाजूला खडे लावलेले असल्यामुळे याला एक पारंपारिक लूक मिळतो. महिला आणि पुरुष दोघेही हे लॉकेट घालू शकतात.

Image credits: pinterest
Marathi

फ्लॉवर डिझाईन लॉकेट

सोन्याचे छोटे घुंगरू लावलेले हे फ्लॉवर डिझाईन लॉकेट खूप आकर्षक दिसते. हे लॉकेट घातल्यास एका बारीक चेनलाही खूप हेवी आणि सुंदर लूक मिळतो.

Image credits: pinterest
Marathi

मोराच्या डिझाईनचं लॉकेट

गोल आकारात एनामेल पेंटने सजवलेले हे मोराच्या डिझाईनचे लॉकेट अतिशय साधे आणि सुंदर दिसते. हे वजनालाही खूप हलके असते.

Image credits: pinterest
Marathi

टियर ड्रॉप डिझाईन लॉकेट

टियर ड्रॉप डिझाईनमध्ये असलेलं हे लॉकेट बारीक चेन आणि मॅचिंग कानातल्यांसोबत खूप छान दिसते. तुम्ही हे लॉकेट अगदी कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

हार्ट शेप लॉकेट

हार्ट शेप लॉकेट आणि स्नेक डिझाईन चेनचं कॉम्बिनेशन एकदम भारी दिसतं. तुम्ही हे सुंदर लॉकेट अवघ्या २ ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता.

Image credits: PINTEREST
Marathi

रांगोळी स्टाईल लॉकेट

मध्यभागी फूल आणि आजूबाजूला रांगोळीसारखी डिझाईन असलेलं हे लॉकेट घातल्यावर खूपच सुंदर दिसतं. कोणत्याही खास कार्यक्रमासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: pinterest

Blouse Back Designs : सिल्क साडीचं सौंदर्य वाढवणारे भन्नाट ब्लाऊज बॅक डिझाईन्स

Black Grapes Benefits : काळ्या द्राक्षांचे 8 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Halter Neck Blouse : साडीला ट्रेंडी लूक देणाऱ्या ब्लाऊजच्या सुपर डिझाईन्स!

Thick Eyebrows : दाट आणि काळ्याभोर भुवया हव्या आहेत? हे ६ घरगुती उपाय नक्की करून पाहा