सध्या चोकर नेकलेसचा ट्रेंड परत आला आहे. पार्टी असो वा लग्न, प्रत्येक ठिकाणी चोकर तुमचा लूक अधिक आकर्षक बनवतो.
स्टोन पेंडंट आणि तीन पदरी कासू असलेला हा गोल्ड प्लेटेड चोकर गळ्याची शोभा वाढवतो. खास कार्यक्रमांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मोती आणि कुंदन लावलेला हा हेवी चोकर गळ्यामध्ये भरगच्च आणि सुंदर दिसतो. हा चोकर साध्या साडीलाही ग्रँड लूक देतो.
तीन लेअर्सच्या मोत्यांचा हा हॉफ मून डिझाइन चोकर सर्व वयोगटातील महिलांना छान दिसतो. फ्रॉक, लेहेंगा आणि साड्यांवर तुम्ही हा घालू शकता.
ज्यांना सिंपल डिझाइन्स आवडतात, त्यांच्यासाठी लीफ डिझाइन चोकर एक चांगला पर्याय आहे. हा चोकर साडीसोबतच ड्रेसवरही घालता येतो. यात तुम्ही खूप सुंदर दिसाल.
ज्यांना मंगळसूत्र स्टाईलमध्ये चोकर हवा असेल, त्यांच्यासाठी हे डिझाइन बेस्ट ऑप्शन आहे. आजच्या पिढीतील मुलींसाठी असे डिझाइन्स खूप छान दिसतात.
मीनाकारी वर्क असलेला हा चोकर घातल्यावर गळा भरलेला दिसतो. विशेष म्हणजे, हा खूप कमी किंमतीत उपलब्ध होतो.
फक्त 5 मिनिटांत कारल्याचा कडूपणा गायब! ही सोपी ट्रिक वापरा
घरात चुकूनही लावू नका ही झाडं, नाहीतर व्हाल कर्जबाजारी
Mangalsutra Pendant : मंगळसूत्राला द्या नवा लूक, पाहा 5 स्टायलिश पेंडंट डिझाइन्स
Silver Bangles : सिल्व्हर बांगड्या, कडं पूर्ण करेल तुमचा लूक, या लेटेस्ट डिझाइन्स नक्की ट्राय करा