Marathi

फक्त 5 मिनिटांत कारल्याचा कडूपणा गायब! ही सोपी ट्रिक वापरा

Marathi

कडूपणाची चिंता सोडा!

कारलं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. पण अनेकांना त्याच्या कडूपणाची भीती वाटते. आता ही चिंता करण्याची गरज नाही. कारल्याचा कडूपणा घालवणं खूप सोपं आहे.

Image credits: Freepik
Marathi

हव्या त्या आकारात कापून घ्या

सर्वात आधी कारलं स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारात (गोल किंवा उभं) कापून घ्या.

Image credits: Freepik
Marathi

मीठ-पाण्याची जादू

एका भांड्यात पाणी गरम करा आणि त्यात एक चमचा मीठ घाला. मीठ कारल्याचा कडूपणा बाहेर काढायला मदत करतं.

Image credits: Getty
Marathi

थोडं उकळू द्या

या गरम मिठाच्या पाण्यात कारल्याचे काप टाका. फक्त 5 ते 10 मिनिटं मध्यम आचेवर हे उकळू द्या.

Image credits: social media
Marathi

पाणी काढून टाका

ठराविक वेळेनंतर गॅस बंद करा. आता भांड्यातील पाणी पूर्णपणे गाळून काढून टाका.

Image credits: Freepik
Marathi

कडूपणा गायब, चव भारी!

अशाप्रकारे मिठाच्या पाण्यात उकळून पाणी काढल्यानंतर कारलं वापरल्यास, त्याचा कडूपणा खूप कमी झालेला असतो.

Image credits: Freepik
Marathi

चविष्ट भाजीसाठी तयार!

आता या फोडींपासून भाजी, किंवा फ्राय करून बघा. कडूपणा नसलेली चविष्ट कारल्याची भाजी तयार!

Image credits: Freepik

घरात चुकूनही लावू नका ही झाडं, नाहीतर व्हाल कर्जबाजारी

Mangalsutra Pendant : मंगळसूत्राला द्या नवा लूक, पाहा 5 स्टायलिश पेंडंट डिझाइन्स

Silver Bangles : सिल्व्हर बांगड्या, कडं पूर्ण करेल तुमचा लूक, या लेटेस्ट डिझाइन्स नक्की ट्राय करा

Solitaire Ring : प्रीमियम फिनिशमधील 6 फॅन्सी सॉलिटेअर स्टोन गोल्ड रिंग डिझाइन्स