Lakshmi Pujan 2024 वेळी फुलांच्या काढा या 6 सुंदर आणि सोपी रांगोळी
Lifestyle Oct 25 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
फुलांची आरास
यंदा लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबरला आहे. या दिवशी देवी लक्ष्मीसह गणपतीची पूजा केली जाते. यंदाच्या लक्ष्मीपूजनावेळी देवीसाठी आसन मांडून त्याच्या बाजूने सुंदर अशी फुलांची रांगोळी काढा.
Image credits: Social Media
Marathi
पणत्या आणि फुलांची सजावट
कलशाच्या आकारात दिवे लावून त्याच्या बाजूने फुलांची सजावट करत लक्ष्मीपूजनावेळी रांगोळी काढू शकता. लख्ख दिव्यांनी देवीचे स्वागत केल्याने ती प्रसन्न होईल.
Image credits: Social Media
Marathi
लक्ष्मीची पावले काढा
लक्ष्मीची पावले काढून तिचे यंदाच्या लक्ष्मीपूजनावेळी घरात स्वागत करा. याशिवाय बाजूने फुलांच्या माळा किंवा फुलांची रांगोळी काढा.
Image credits: Social Media
Marathi
गोंड्यांच्या फुलांची रांगोळी
गोंड्याची फुल आणि आंब्याची पाने वापरुन गोलाकार अशी सुंदर रांगोळी घराच्या प्रवेशाद्वाराजवळ काढू शकता. यासाठी वेगवेगळ्या रंगातील फुलांचाही वापर करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
प्रवेशद्वारावर काढण्यासाठी खास रांगोळी
लक्ष्मीपूजनावेळी प्रवेशाद्वारावर सुंदर आणि सोपी अशी रांगोळी काढू शकता. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि गोंड्यांच्या फुलांचा वापर करू शकता.