Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
साहित्य
मुगडाळ – १ कप, कोथिंबीर – १ कप, हिरवी मिरची-आलं-लसूण पेस्ट – २ चमचे, तिखट – १ चमचा, हळद – ½ चमचा,लिंबाचा रस – १ चमचा, मीठ – चवीनुसार, तेल – २ चमचे,मोहरी, कडीपत्ता, हिंग – फोडणीसाठी
Image credits: Social Media
Marathi
डाळ भिजवणे
मुगडाळ ४-५ तास स्वच्छ धुऊन पाण्यात भिजत ठेवा.
Image credits: Social Media
Marathi
वाटण तयार करणे
भिजवलेली डाळ पाणी न घालता जाडसर वाटून घ्या. त्यात हिरवी मिरची-आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, तिखट, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. चांगले मिश्रण करून घ्या.
Image credits: Social Media
Marathi
वडी वाफवणे
हे मिश्रण एका तुप लावलेल्या थाळीत (किंवा साच्यात) समान पसरून घ्या. नंतर वाफेवर १५-२० मिनिटे ठेवा. वाफवून झाल्यावर थोडे थंड होऊ द्या आणि नंतर चौरस तुकडे कापा.
Image credits: Social Media
Marathi
वड्या परतणे
कढईत तेल गरम करून मोहरी, कडीपत्ता, हिंग यांची फोडणी करा. त्यात हे वाफवलेले वडीचे तुकडे हलक्या हाताने परतून घ्या. यानंतर गरमागरम मुगडाळ-कोथिंबीर वडी चहा किंवा दहीसोबत सर्व्ह करा.