पालकची पेस्ट तयार करुन त्याचे आइस क्यूब तयार करुन स्टोर करा. याचा वापर पालक पनीर, पालक सूप अथवा ग्रेव्हीसाठी करू शकता.
फरसबीची भाजी देखील फ्रोजन फूडमध्ये मिळते. घरच्याघरी दीर्घकाळ फरसबीची भाजी टिकवण्यासाठी कापून थोडी उकळवून सुकवा. यानंतर जिपलॉक बॅगमध्ये भरुन फ्रिज करा.
मक्याचे दाणे दीर्घकाळ फ्रीजमध्ये स्टोर करता येऊ शकतात. यासाठी दाणे काढून फ्रीज करा. या दाण्यांचा वर्षभर वापर पुलाव, सँडविच अथवा सूपमध्ये करू शकता.
थंडीत मटारची भाजी मोठ्या प्रमाणात येते. पण अन्य सीझनमध्ये मटारची भाजी फार महाग मिळते. अशातच घरच्या फ्रीजमध्ये मटार फ्रिज करुन वर्षभर वापरू शकता.
गाजरही फ्रिज केला जाऊ शकतो. यासाठी गाजरचे बारीक तुकडे करुन आधी मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर झाकणबंद डब्यात भरुन फ्रिज करा.
टेमॅटोही दीर्घकाळ टिकवून वापरू शकता. यासाठी टोमॅटोची प्युरी तयार करुन फ्रिज करा.
ब्रोकोली अत्यंत महागडी भाजी आहे. ब्रोकोली दीर्घकाळ वापरण्यासाठी गरम पाण्यात थोडी उकळवून घ्या. यानंतर व्यवस्थितीत सुकवून झिपलॉक बॅगेत भरुन ठेवा.