दिवाळीसाठी पातळ पोह्यांएवजी भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार करू शकता. यासाठी भाजके पोहे, शेंगदाणे, सुक खोबऱ्याचा वापर करुन चिवडा तयार करता येईल.
यंदाच्या दिवाळीसाठी मक्याचा चिवडा तयार करू शकता. आंबट-तिखट चव असणाऱ्या चिवड्यासाठी शेंगदाणे, चणाडाळ, मीठ असे साहित्य वापरुन चिवडा तयार करा.
दिवाळीत बहुतांशजणांच्या घरी पातळ पोह्यांचा चिवडा तयार केला जातो. खमंग आणि कुरकुरीत असा पातळ पोह्यांच्या चिवड्यासाठी शेंगदाणे, भाजलेले सुक खोबरे, चणा डाळ, कढीपत्ता वापरा.
नाशिकचा चिवडा चवीला गोड असतो. यामुळे दिवाळीत गोड पदार्थांसोबत नाशिकचा चिवडा यंदा ट्राय करून पाहा. यासाठी सुक खोबर, शेंगदाणे, कोकमचा वापर करावा लागेल.
चटपटीत आणि झटपट होणारे कोल्हापुरी स्टाइल भडंग यंदाच्या दिवाळीत तयार करू शकता. यासाठी कुरमुरे भाजून त्यामध्ये लाल तिखट, शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची आणि मीठ घालून भडंग तयार करता येईल.