प्रसिद्ध युट्युबर खान सर यांना पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी बीपीएससी परीक्षेतील बदलांविरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
खान सर या नावाने प्रसिद्ध असलेले फैजल खान पाटण्यात कोचिंग क्लास चालवतात. ते मुख्यतः स्पर्धा परीक्षांची तयारी करवुन घेतात.
खान सरांचे म्हणणे आहे की कोणी त्यांचे नाव अमित तर कोणी फैजल असे सांगतात. ते स्वत:ला कोणत्याही जाती-धर्माशी जोडत नाही, त्यामुळे ते स्वत: त्यांचे खरे नाव उघड करत नाहीत.
खान सरांचा जन्म १९९३ मध्ये गोरखपूर, यूपी येथे झाला. लहानपणी ते अभ्यासात खूपच कमजोर होते.
खान सर अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या प्रसिद्ध शोमध्येही दिसले आहेत.
खान सरांच्या म्हणण्यानुसार, सैन्यात भरती होण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु ते वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त नसल्यामुळे ते अपूर्ण राहिले.
खान सर आपल्या मित्रांसोबत परीक्षेची तयारी करत असत आणि कोणाला काही समजले नाही तर ते त्यांच्या पद्धतीने समजावून सांगायचे. त्यांच्या मित्रांना त्यांची समजावून सांगण्याच पद्धत आवडायची
यानंतर, हळूहळू आसपासच्या भागातील लोक खान सरांकडे शिकायला येऊ लागले आणि त्यांनी स्वतःचे कोचिंग उघडले. आज परिस्थिती अशी आहे की त्यांना माईक घेऊन क्लासेस घ्यावे लागतात.
त्यांनी 'खान जीएस रिसर्च सेंटर' या नावाने स्वतःचे YouTube चॅनल देखील उघडले आहे. ज्याचे २३.९ दशलक्ष फॉलोवर्स आहेत.
इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, खान सरांची जवळपास ४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांची मासिक कमाई १८-२०लाख रुपये आहे, तर त्यांची रोजची कमाई ७० हजार रुपये आहे.