मलाईचा त्वचेसाठी वापर करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन A,D आणि E असते. यामुळे त्वचेला ओलसरपणा आणि ग्लो येण्यास मदत होते.
त्वचेवर ग्लो येण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. जेणेकरुन मलाईचा वापर करत चेहऱ्यावर ग्लो येईल.
1 चमचा मलई, चिमूटभर हळद घेऊन पेस्ट तयार करा. यानंतर पेस्ट चेहरा आणि मानेवर 5-20 मिनिटे लावून ठेवून धुवा. यामुळे त्वचेला ग्लो येईल.
1 चमचा मलई आणि 1 चमचा बेसन व्यवस्थितीत मिक्स करुन पेस्ट तयार करा. पेस्ट चेहऱ्याला 15-20 मिनिटे लावून ठेवा. यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.
1 चमचा मलई आणि 1 चमचा मध घेऊन दोन्ही गोष्टी एकत्रित मिक्स करा. चेहऱ्याला 10 मिनिटे लावून ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा मऊसर होईल.
1 चमचा मलईमध्ये 1 चमचा गुलाब पाणी मिक्कस करुन चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याला चमक येईल.
मलई आणि लिंबाचा फेस पॅकमुळे त्वेचा ग्लो येईल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.