चाणक्य म्हणतात की प्रत्येकाने स्वतःच्या स्वभावाचा आणि गतकाळातील कृतींचा आढावा घेतला पाहिजे. मागील वर्षात काय चुकलं आणि काय चांगलं झालं यावर विचार करून नवीन ध्येय ठरवावीत.
नवीन वर्ष हे नवीन कौशल्ये शिकण्याची उत्तम संधी आहे. जे ज्ञान तुम्हाला पुढे नेईल, त्यावर लक्ष केंद्रित करा.
अर्थ म्हणजे जीवनाचा मुख्य आधारस्तंभ. पैशाचे योग्य नियोजन करा, बचत आणि गुंतवणुकीकडे लक्ष द्या.
सकारात्मक आणि यशस्वी लोकांच्या संगतीत राहा. चुकीच्या लोकांपासून लांब राहा, कारण वाईट संगत तुमचे नुकसान करू शकते.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपली दिनचर्या शिस्तबद्ध करा. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घ्या.
आपली मोठी उद्दिष्टे आणि महत्त्वाची योजना सर्वांसोबत शेअर करू नका. योग्य वेळ आल्यावरच त्यांची अंमलबजावणी करा.