आजकाल बहुतेक घरात वाशिंग मशीन वापरली जाते. वाशिंग मशीनची योग्य देखभाल केल्याने ती अधिक काळ टिकते आणि व्यवस्थित कार्य करते. वाशिंग मधीन वारण्या बाबत काही टिप्स पुढे सांगितल्या आहेत.
वाशिंग मशीनमध्ये जास्त कपडे टाकल्याने मोटरवर ताण येतो. मशीनच्या क्षमतेनुसारच कपडे टाका.
मशीनसाठी खास तयार केलेले डिटर्जंट वापरा. सामान्य डिटर्जंटमुळे मशीनमध्ये फोमचा साठा होऊ शकतो.
मशीन वापरून झाल्यानंतर डोअर उघडी ठेवा, त्यामुळे आतली ओलसरता कमी होते आणि बुरशी येत नाही.
मशीनच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत आहे का, हे तपासा. ड्रेन पाइप नियमित स्वच्छ ठेवा.
वाशिंग मशीन एका स्थिर ठिकाणी ठेवा. हलती जागा मशीनसाठी हानिकारक ठरू शकते.
वीजपुरवठ्यासाठी सर्ज प्रोटेक्टर वापरा, ज्यामुळे अचानक वीजेचा झटका बसणार नाही.
मशीनच्या मोटर, बेल्ट किंवा अन्य भागांमध्ये काही बिघाड आहे का, हे तज्ज्ञांच्या मदतीने वेळोवेळी तपासा.
वाशिंग मशीनच्या मॅन्युअलमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा.
मशीन दीर्घ काळ वापरत नसल्यास ड्रेन पाईप काढून ठेवा आणि मशीन पाण्याशिवाय ठेवा