पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी, मॉइश्चरायझर वापरायला विसरू नका
Lifestyle Jun 04 2025
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
पावसाळा आणि त्वचा यांचं अनोखं नातं
पावसाळ्यातील दमट हवामानामुळे त्वचेवर घाम, चिकटपणा, बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव, मुरुमे आणि फंगल इन्फेक्शन वाढतात. त्यामुळे या काळात त्वचेसाठी वेगळी आणि काळजी आवश्यक आहे.
Image credits: Pinterest
Marathi
चेहरा स्वच्छ ठेवणे आवश्यक
दिवसातून किमान दोन वेळा फेसवॉशने चेहरा धुवा. त्वचेवर साचलेली घाण, घाम आणि ओलसरपणा यामुळे येणारे मुरुम टाळता येतात.
Image credits: Instagram
Marathi
मॉइश्चरायझर नक्की वापरा
पावसाळ्यात त्वचा बाहेरून ओलसर वाटली तरी आतून कोरडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑइल-फ्री मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे.
Image credits: Instagram
Marathi
सनस्क्रीन वापरायला सुरुवात करा
ढगाळ हवामानातही अल्ट्राव्हायोलेट किरणांचा त्रास होतो. म्हणून पावसातही SPF 30 किंवा त्याहून अधिक SPF असलेला सनस्क्रीन रोज लावा.
Image credits: Instagram
Marathi
घरगुती स्क्रबिंग करा
साखर आणि मध किंवा बेसन आणि दुध यांचा स्क्रब वापरून आठवड्यातून एकदा त्वचा घासल्याने मृत पेशी निघून जाते आणि त्वचा उजळते.