प्रत्येक ऋतुत कारची काळजी घेण्यासाठी उपाय योजना कराव्या लागतात. या स्टोरीतून हिवाळ्यात कारची योग्य देखभाल कशी करावी याची माहिती घेऊया. असे केल्यास कारची कार्यक्षमता टिकून राहते.
थंड वातावरणात बॅटरी कमजोर होण्याची शक्यता असते. त्यामुळे बॅटरीचे चार्जिंग व टर्मिनल्स स्वच्छ आहेत काहे तपासा. बॅटरी पूर्ण चार्ज ठेवा आणि तिचा व्होल्टेज वेळोवेळी तपासा.
इंजिन ऑईल थंड हवामानासाठी योग्य व्हिस्कोसिटी असलेले वापरा. कुलंटची पातळी व त्याचे मिश्रण योग्य प्रमाणात आहे का तपासा. अँटीफ्रीझ इंजिन थंड होण्यापासून व गारठण्यापासून संरक्षण करते.
हिवाळ्यात रस्ते ओले, घसरडे होतात, त्यामुळे टायर्सची ग्रिप चांगली असावी. टायर्समधे हवेचा दाब योग्य ठेवा, कारण थंड हवामानामुळे हवेचा दाब कमी होतो. गरज असल्यास हिवाळी टायर्स बसवा.
ब्रेक्सची कार्यक्षमता तपासा. ब्रेक्स योग्यरितीने कार्य करत नसल्यास थंड हवामानात त्याचा धोका वाढतो.
विंडशील्ड स्वच्छ ठेवा. त्यावर अँटी-फ्रॉस्ट प्रोटेक्शन कोटिंग लावा. वायपर्सची ब्लेड्स खराब झाल्यास बदला. विंडशील्ड वॉशर फ्लूइडमध्ये अँटीफ्रीझ फ्लूइड वापरा जे थंड हवामानात गोठत नाही.
कारच्या हीटर आणि डीफ्रॉस्टर यंत्रणेची कार्यक्षमता तपासा. हिवाळ्यात ही यंत्रणा अधिक महत्त्वाची ठरते.
टाकीतील इंधन नेहमी अर्धे किंवा अधिक ठेवा. थंड हवामानात टाकी रिकामी असल्यास त्यात ओलावा तयार होऊ शकतो.
कार नियमितपणे धुणे आणि वॅक्स करणे गरजेचे आहे. कारच्या खालील भाग स्वच्छ करा, कारण इथे गंज लवकर होतो.
थंड हवामानात कार सुरू करताना इंजिनला गरम होण्यासाठी काही सेकंद थांबा, विशेषतः जुन्या कारसाठी.