बटाटे – 3 मध्यम, फुलकोबी – 1 वाटी, मटार – ½ वाटी, टोमॅटो – 3, कांदा – 2 मध्यम, लसूण-आलं पेस्ट – 1 टेबलस्पून, पावभाजी मसाला – 2 टीस्पून, तिखट, हळद, मीठ – चवीनुसार, पाव – 4
बटाटे, फुलकोबी आणि मटार प्रेशर कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत उकडून घ्या आणि मॅश करून ठेवा.
कढईत लोणी टाका, त्यात कांदा, लसूण-आलं पेस्ट परतून घ्या. टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतवा. नंतर पावभाजी मसाला, तिखट, हळद, मीठ टाकून चांगलं परतवा.
मॅश केलेल्या भाज्या हळूहळू घालून नीट मिक्स करा. गरज असल्यास थोडंसं पाणी टाका. मध्यम आचेवर १० मिनिटं शिजवा.
तव्यावर लोणी घालून पाव दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
गरमागरम भाजीला वरून लोणी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा तुकडा घालून गरम पावसोबत सर्व्ह करा.
जांभळाचे हे १३ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?, जाणून घ्या
पावसाळ्यात घरातील डासांना पळवून लावण्यासाठी करा हे ७ उपाय
पचनसंस्थेचे आरोग्य बिघडले आहे का?, स्वयंपाकघरातील हे पदार्थ खा
कोणते ७ पदार्थ जे प्रेशर कुकरमध्ये शिजवू नयेत?, जाणून घ्या