Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला साबुदाणा वडा कसा बनवावा?
Lifestyle Jul 06 2025
Author: vivek panmand Image Credits:Pinterest
Marathi
आषाढी एकादशीचं महत्त्व
आषाढी एकादशी ही भक्ती, श्रद्धा आणि व्रताची विशेष पर्वणी असते. उपवास करताना शुद्ध आणि सात्विक पदार्थांचा समावेश केला जातो.
Image credits: Pinterest
Marathi
साहित्य
साबुदाणा – १ कप, उकडलेले बटाटे – २ मध्यम आकाराचे, भाजलेले दाण्याचे कूट – ½ कप, हिरव्या मिरच्या – २, कोथिंबीर – २ टेबलस्पून, मीठ – स्वादानुसार, लिंबाचा रस – १ टीस्पून
Image credits: Pinterest
Marathi
वडा तयार करण्याची कृती
भिजवलेला साबुदाणा सकाळी चांगला निथळून घ्या. उकडलेले बटाटे किसा किंवा मॅश करा. साबुदाणा, बटाटे, दाण्याचं कूट, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, मीठ व लिंबाचा रस घालून एकजीव करा.
Image credits: Pinterest
Marathi
वडे तेलात तळून घ्या
मिश्रणाचे छोटे गोळे तयार करा. हाताने थोडे दाबून वडे बनवा. कढईत तेल गरम करा व मध्यम आचेवर हे वडे कुरकुरीत तळून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरीसरखे रंग येईपर्यंत तळा.
Image credits: Pinterest
Marathi
वडे चविष्ट करण्यासाठी काय करावं?
साबुदाणा भिजवताना केवळ बुडेल इतकं पाणी वापरा. दाण्याचं कूट थोडं खमंग भाजून वापरल्यास चव वाढते. वडे तळताना तेल मध्यम तापमानावर असावं.