२ कप मखाणे १ कप खजूर (बारीक चिरलेले) १/२ कप ड्रायफ्रुट्स (बदाम, काजू, अक्रोड – चिरलेले) १/२ कप गूळ (किसलेला) २ चमचे तूप १/२ चमचा वेलदोडा पूड
कढईत १ चमचा तूप गरम करून त्यात मखाणे घाला. मध्यम आचेवर ५-७ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत भाजा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर पूड करा.
त्याच कढईत थोडेसे तूप टाकून बदाम, काजू आणि अक्रोड सौम्य भाजून घ्या.
एका भांड्यात गूळ आणि १ चमचा तूप घालून मंद आचेवर हलवून वितळवून घ्या.
गूळ वितळल्यावर त्यात मखाण्याची पूड, भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि खजूर टाका. मिश्रण चांगले हलवा आणि शेवटी वेलदोडा पूड टाका.
मिश्रण कोमट असतानाच हाताला तूप लावून छोटे-छोटे लाडू वळा. गार झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा
घरच्याघरी तयार करा टेस्टी Samosa Sandwich, वाचा रेसिपी
Chanakya Niti: चुकूनही करू नका या 3 लोकांची मदत
उन्हाळ्यात कोणते कपडे घालायला हवेत?
सुकलेली झाडे होतील टवटवीत, वापरा ही एक पांढरी वस्तू