भेळ हा झटपट तयार होणारा आणि सर्वांचा आवडता स्नॅक आहे. बाहेरच्या भेळेला तोड नाही, पण तीच चव तुम्ही घरच्या घरीही मिळवू शकता. खाली दिलेल्या पद्धतीने स्वादिष्ट भेळ सहज तयार करता येईल.
चुरमुरे: 2 कप, शेंगदाणे 1/4 कप, तिखट शेव: 1/2 कप कांदा, 1 टोमॅटो, 1 काकडी: 1/4 कप, आमचूर चटणी 2 चमचे, कोथिंबीर चटणी 2 चमचे, लिंबू रस 1 चमचा, मीठ चवीनुसार, चिरलेली कोथिंबीर
एका पॅनमध्ये चुरमुरे थोडे कुरकुरीत होईपर्यंत भाजा. यामुळे भेळ अधिक चवदार लागेल. एका मोठ्या बाऊलमध्ये चुरमुरे घ्या. त्यात भाजलेले शेंगदाणे, तिखट शेव, कांदा, टोमॅटो, आणि काकडी टाका.
चुरमुर्यांमध्ये आमचूर चटणी, कोथिंबीर चटणी, आणि चिंच-गुळाची चटणी घाला. या चटण्यांमुळे भेळ चवदार आणि रसरशीत होते. त्यामध्ये लिंबू पिळून रस घाला.
मिश्रणात लिंबू रस आणि चवीनुसार मीठ घालून साहित्य मिसळून घ्या. भेळ कपात किंवा पानात वाढा. वरून चिरलेली कोथिंबीर आणि शेव घालून सजवा.