Marathi

अक्षय तृतीयेला पुरणपोळी कशी बनवावी?

Marathi

साहित्य

हरभऱ्याची डाळ – 1 कप, गूळ – 1 कप, वेलदोडा पूड – ½ टीस्पून, जायफळ पूड – ¼ टीस्पून (ऐच्छिक), मीठ – एक चिमूट, गव्हाचे पीठ – 1½ कप, तेल – 2 टेबलस्पून, पाणी – आवश्यकतेनुसार

Image credits: social media
Marathi

डाळ शिजवणे

हरभऱ्याची डाळ 2-3 तास भिजवा. कुकरमध्ये डाळ मऊ होईपर्यंत (2-3 शिट्ट्या) शिजवा. शिजलेली डाळ गाळून घ्या.

Image credits: social media
Marathi

पुरण तयार करणे

एका कढईत गूळ आणि थोडं डाळीचं पाणी घालून गूळ वितळवा. नंतर त्यात शिजलेली डाळ घालून मध्यम आचेवर सतत हलवत राहा. घट्ट होईपर्यंत शिजवा. वेलदोडा व जायफळ पूड घालून मिक्स करा.

Image credits: social media
Marathi

पोळीचं पीठ मळणे

गार होऊ द्या आणि सारणाचे गोळे करून ठेवा. गव्हाच्या पीठात थोडं तेल, मीठ व पाणी घालून मऊ पीठ मळा. झाकून 30 मिनिटं ठेवून द्या.

Image credits: social media
Marathi

पुरणपोळी तयार करणे

पीठाचा एक गोळा घ्या, लाटून मधोमध पुरण भरा. नीट बंद करून पुन्हा हलक्या हाताने पोळी लाटा. गरम तव्यावर तूप घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा.

Image credits: social media
Marathi

अधिक टिप्स

शिजवलेली डाळ मिक्सरमध्ये एकदाच फिरवली तर पुरण गुळगुळीत होते. फुलणारी, सौम्य आणि गोडसर पुरणपोळी हवी असेल तर गूळ योग्य मापात वापरा. सोबत गार तूप, कट किंवा दूध दिलं तर चव वाढते!

Image credits: social media

अक्षय्य तृतीया 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवा मराठमोळे संदेश

कृति सेननचे आकर्षक सूट डिझाईन्स बघून तुम्हीही पडाल प्रेमात, बघा PHOTOS

Chanakya Niti: नातेसंबंध, शिक्षण आणि जीवनावरील चाणक्यचे 8 अमर मंत्र

कोलेजन बूस्ट करण्यासाठी बेस्ट 6 फूड्स, त्वचा दिसेल चिरतरुण