वाढत्या वयासह थकवा जाणवतो? शरीराला उर्जा मिळण्यासाठी करा ही 5 कामे
Lifestyle Feb 24 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
आरोग्याची काळजी
वाढत्या वयामध्ये फिट राहण्यासाठी दररोज एक्सरसाइज, योगा किंवा मेडिटेशन करा. यामुळे हृदयरोग व कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय मूड, झोप आणि त्वचेचे आरोग्य राखले जाते.
Image credits: Getty
Marathi
शरीराला उर्जा मिळण्यासाठी काय करावे
वाढत्या वयासह थकवा जाणवत असल्यास शरीराला उर्जा मिळण्यासाठी पुढील कामे नक्की करा.
Image credits: Getty
Marathi
हेल्दी डाएट
शरीराला उर्जा आणि महत्वाची पोषण तत्त्वे मिळण्यासाठी हेल्दी डाएट खा. यामध्ये व्हिटॅमिन डी, फळ-भाज्यांचा समावेश करावा. जंक आणि प्रोसेस्ड फूड्सपासून दूर रहा.
Image credits: Freepik
Marathi
मानसिक आरोग्य
मानसिक आरोग्याची काळजी घ्या. मित्रपरिवारासोबत वेळ घालवा. आवडीच्या अॅक्टिव्हिटी करा.
Image credits: Social media
Marathi
पुरेशी झोप घ्या
स्क्रिन टाइम कमी करा आणि झोपण्यापूर्वी मोबाइचा वापर करू नका. दररोज 7-8 तासांची झोप घ्या. जेणेकरुन हृदयरोग आणि डिप्रेशनच्या धोक्यापासून दूर रहाल.
Image credits: unsplash
Marathi
हेल्थ चेकअप करा
नियमित रुपात हेल्थ चेकअप करा. जेणेकरुन कोणत्याही आजाराबद्दल वेळीच कळले जाईल. याशिवाय त्यावर योग्य उपचारही करता येईल.
Image credits: Facebook
Marathi
वॉक आणि स्ट्रेचिंग
हाडं आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी दररोज वॉक आणि स्ट्रेचिंगसारखी हलकी एक्सरसाइज करा.
Image credits: Getty
Marathi
पुरेशा प्रमाणात पाणी प्या
दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्या. यामुळे हाइड्रेट राहण्यास मदत होईल. याशिवाय पचनक्रिया सुधारली जाईल.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.