Marathi

या सोप्या टिप्स फॉलो करा, कढीपत्त्याचं रोप अगदी दाट होईल!

Marathi

कुंडी निवडण्याची पद्धत

कढीपत्त्याचं झाड बरंच मोठं होतं. त्यामुळे किमान १२ ते १५ इंच खोल आणि रुंद मातीची किंवा प्लास्टिकची कुंडी निवडा. कुंडीच्या तळाला छिद्र असणं गरजेचं आहे.

Image credits: instagram
Marathi

माती कशी असावी

सामान्य लाल मातीत सेंद्रिय खत किंवा शेणखत मिसळा. यात २०% वाळू किंवा कोको पीट मिसळल्यास कुंडीत पाणी साचून राहणार नाही.

Image credits: instagram
Marathi

रोप किंवा बिया पेरणं

नर्सरीतून चांगलं रोप आणून लावणं सर्वात सोपं आहे. जर बियांपासून रोप लावायचं असेल, तर पिकलेल्या (काळ्या रंगाच्या) कढीपत्त्याच्या बिया वापरा. सुक्या बियांपासून रोप उगवत नाही.

Image credits: instagram
Marathi

ऊन किती गरजेचं

कढीपत्त्याच्या झाडाला दिवसाला किमान ६ ते ७ तास ऊन आवश्यक आहे. त्यामुळे कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे चांगलं ऊन येईल.

Image credits: Getty
Marathi

पाणी आणि खत

मातीचा वरचा थर सुकल्यावरच पाणी द्या. उगाच पाणी देऊ नका. जास्त पाण्यामुळे मुळं कुजतात. महिन्यातून एकदा मूठभर शेणखत किंवा गांडूळ खत द्यावं.

Image credits: Getty
Marathi

ताक किंवा आंबट पाणी

घरातील आंबट ताक पंधरा दिवस ठेवून द्या, त्यानंतर ते पाण्यात मिसळून आठवड्यातून एकदा रोपाला द्या.

Image credits: Getty
Marathi

फांद्या कापणं किंवा ट्रिमिंग

रोप थोडं मोठं झाल्यावर वरचे कोवळे शेंडे कापून टाका. यामुळे झाड फक्त उंच न वाढता आजूबाजूने नवीन फांद्या फुटतात.

Image credits: instagram
Marathi

कीड नियंत्रण

कढीपत्त्याच्या पानांवर पांढरे डाग किंवा काळे कीटक दिसल्यास, आठवड्यातून एकदा पाण्यात कडुलिंबाचं तेल मिसळून फवारणी करा.

Image credits: Our own
Marathi

तांदूळ धुतलेलं पाणी

तांदूळ किंवा डाळ धुतलेलं पाणी रोपाला दिल्यास कढीपत्त्याला खूप लवकर कोवळी पानं येतात.

Image credits: Our own

Badam Benefits : रोज मूठभर बदाम खाण्याचे 7 जबरदस्त फायदे

Brain Foods : मेंदू तल्लख करण्यासाठी खा हे 9 पदार्थ

Curd Benefits : दररोज दही खाताय? मग या 6 गोष्टी नक्की जाणून घ्या

Baby Anklets : चिमुकलीसाठी क्यूज पैंजण... किती सुंदर दिसतात, एकदा डिझाइन्स पाहाच