मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारे ९ पदार्थ.
सॅल्मन, सार्डिन आणि मॅकेरल यांसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असते. हे मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
अँथोसायनिन आणि अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असलेल्या ब्लूबेरीज मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि सूज कमी करतात. यामुळे स्मरणशक्ती सुधारते.
पालक आणि ब्रोकोलीमध्ये जीवनसत्व 'के', ल्युटीन, फोलेट आणि बीटा-कॅरोटीन हे महत्त्वाचे घटक असतात. हे मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात.
अंड्यांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले 'कोलिन' हे पोषक तत्त्व असते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मूड चांगला ठेवण्यासाठी अंडी उपयुक्त ठरतात.
विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स आणि बिया खाल्ल्याने मेंदूच्या पेशींचे नुकसानीपासून संरक्षण होते.
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅफीन असते. यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढतो, मूड सुधारतो आणि स्मरणशक्ती तेज होते.
ओट्स, बार्ली आणि ब्राऊन राइस यामुळे मानसिक ऊर्जा आणि उत्साह टिकून राहण्यास मदत मिळते.
कॉफीमधील कॅफीनमुळे एकाग्रता वाढते आणि उत्साह टिकून राहतो. शिवाय, यामध्ये पॉलिफेनोल्स सारखे अँटिऑक्सिडंट्सही असतात.
ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. हे मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करतात.
Curd Benefits : दररोज दही खाताय? मग या 6 गोष्टी नक्की जाणून घ्या
Baby Anklets : चिमुकलीसाठी क्यूज पैंजण... किती सुंदर दिसतात, एकदा डिझाइन्स पाहाच
Boiled Eggs : अंडं परफेक्ट उकडायला किती वेळ लागतो?
Baby Anklets : लहानग्यांसाठी छोट्या पैंजण.. चिमुकल्या पावलांना किती सुंदर दिसतात!