उन्हाळ्यात बहुतांशजण सनस्क्रिनचा वापर करतात. पण खरेदी केलेली सनस्क्रिन त्वचेसाठी सुरक्षित आहे की नाही हे कसे ओखळावे याबद्दल पुढे जाणून घेऊया.
सनस्क्रिला सुगंध येण्यासाठी यामध्ये काही केमिकल्सचा वापर केला जातो. यामुळे त्वचेवर अॅलर्जीची समस्या उद्भवू शकते. खासकरुन सेंसेटिव्ह त्वचा असणाऱ्यांना याचा त्रास होऊ शकते.
सिलिकॉनयुक्त सनस्क्रिनचा वापर केल्याने त्वचेवर एक लेअर तयार होतो. यामुळे घाण आणि घाम आतमध्येच मुरला जातो. अशातच त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात.
ऑक्सीबेनजोन एक केमिकल कंपाउंड आहे,जो त्वचेच्या आतमध्ये जाऊन हार्मोनल असंतुलित करू शकतो. यामुळे गर्भवती महिलांनी अशाप्रकारचे सनस्क्रिन खरेदी करू नये.
रेटिनिल पामिटेट व्हिटॅमिन ए चे एक रुप आहे, जे अँटी एंजिंगच्या गुणांसाठी सनस्क्रिनमध्ये मिक्स केले जाते. पण ज्यावेळी सूर्याच्या किरणांसोबत संपर्क येते तेव्हा त्वचेचे नुकसान होते.
योग्य सनस्क्रिन निवडण्यासाठी त्यामधील इंग्रीडिएंट्सकडे लक्ष द्या. यामध्ये नैसर्गिक गोष्टी, एसपीएफ 30 पेक्षा अधिक सनस्क्रिनचा वापर करावा.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.