रोज ४ ते ५ किलोमीटर चालल्यास वजन कमी होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या वयानुसार चालण्याचे किलोमीटर बदलू शकतात.
१८ ते ३० वयोगटातील युवकांमध्ये चांगली एनर्जी आणि दणकट स्नायू असतात. त्यामुळं या वयोगटातील तरुणांनी ३० ते ६० मिनिट चाललं पाहिजे.
या वयोगटात वजन नियंत्रणात राहण्यासाठी चालणे महत्त्वाचे आहे. त्यासोबत जुन्या आजारांना प्रतिबंध करण्यास आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी 30 - 45 मिनिटं चालणे फायदेशीर असत.
या वयात अनेक दुखणे त्रासदायक ठरतात. या वयोगटातील लोकांनी दिवसातून 30 - 40 मिनिटं चालणं आरोग्यासाठी वरदान ठरतं.
वृद्ध लोकांनी दिवसभरात कधीही किमान 20 - 30 मिनिटं मध्यम वेगाने चालणे फार गरजेचे आहे. या वयात चालण्याने वयोवृद्धांचा बॅलन्स चांगला राहतो.
चालण्यासाठी काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. चालण्यासाठी सपाट परिसराची निवड करावी. चालण्यासाठी चांगले शूज आणि सुरक्षित मार्ग निवडणे गरजेचे आहे.