धावत्या गाडीत विशिष्ट कंपन तयार होतात, त्यामुळे प्रवाशाला लवकर झोप लागते. या कंपनामुळे मेंदूला शांती आणि आराम भेटायला मदत होते.
आपण प्रवास करत असाल तर यावेळी आपलं शरीर दाटलेलं असत. आरामदायी आसनावर बसल्यामुळे आपल्याला झोप लागणं साहजिक आहे.
आपल्या डोळ्याला आणि कानाला कारमध्ये फारसे काही अनुभवायला येत नाही. त्यामुळे मेंदूची सजगता कमी होते आणि आपल्याला झोप येऊ लागते.
गाडीच्या आतील वातावरण प्रवाशाच्या झोपेला पूरक असते. जे लोक आधीच थकलेले आहेत किंवा झोप कमी आहेत त्यांना प्रवासादरम्यान अधिक सहज झोप येते.
गाडीच्या आतमध्ये सूर्याचा प्रकाश कमी प्रमाण पोहचल्यामुळे प्रवाशाला झोप लागून जाते. बऱ्याच वेळा आपली सर्केडियन लय बिघडते आणि आपल्या मेंदूला असे वाटते की झोपण्याची वेळ आली आहे.
ड्रायव्हर गाडी चालवत असताना त्याचे मन आणि डोळे समोरच्या रस्त्यावर असतात आणि त्याचे संपूर्ण लक्ष वाहन चालविण्यावर असते, त्यामुळे त्याला झोप येत नाही.