Marathi

मानेचा काळेपणा कसा दूर कराल?

मानेभोवतीचा काळेपणा दूर करणे आता खूप सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही घरगुती आणि सोपे उपाय वापरावे लागतील.

Marathi

बर्फाचा खडा

तुम्ही बर्फाच्या खड्याने मानेभोवती मसाज करू शकता. एका स्वच्छ सुती कापडात बर्फाचे खडे गुंडाळा आणि मानेवर हलक्या हाताने मसाज करा.

Image credits: Freepik
Marathi

दही

दोन चमचे ताजं दही घ्या आणि ते मानेवर व्यवस्थित लावा. पंधरा मिनिटांनंतर तुम्ही तुमची मान साध्या पाण्याने स्वच्छ धुऊ शकता.

Image credits: Getty
Marathi

बदामाचे तेल

तुम्ही बदामाचे तेल मानेभोवती लावू शकता. हे तेल मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

Image credits: Pixabay
Marathi

बटाट्याचा रस

बटाट्याचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्याचा रस मानेवर लावा. १५ मिनिटांनंतर मान थंड पाण्याने धुवून काढा.

Image credits: instagram
Marathi

कोरफड जेल

कोरफडीचे जेल मानेवर चांगल्या प्रकारे लावून घ्या. अर्ध्या तासानंतर तुम्ही मान स्वच्छ पाण्याने धुऊ शकता.

Image credits: our own
Marathi

ॲपल सायडर व्हिनेगर

दोन चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घ्या. एका कापसाच्या बोळ्याने ते मानेवर लावा आणि थोड्या वेळानंतर मान साध्या पाण्याने धुवा.

Image credits: Getty
Marathi

कॉफी पावडर

कॉफी पावडर दह्यामध्ये मिसळा आणि हे मिश्रण मानेभोवती लावा. यामुळे मानेचा काळेपणा लवकर कमी होण्यास मदत होईल.

Image credits: Getty

Glowing Skin Juices : चमकदार त्वचेसाठी 5 बेस्ट ज्यूस, नैसर्गिकरित्या मिळवा ग्लो

Bracelet Designs : हातांचे सौंदर्य वाढवणाऱ्या ब्रेसलेट डिझाईन्स; डेली वेअरसाठी आहेत बेस्ट

Squat Exercises : मजबूत पायांसाठी करा हे ८ प्रकारचे स्क्वाट्स!

Pigmentation Serums : चेहऱ्यावरील काळे डाग गायब करणारे बेस्ट सीरम!