चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी फेसवॉशमध्ये असाव्यात या गोष्टी
Lifestyle Feb 24 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
चेहऱ्याचे सौंदर्य
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट किंवा महागडे प्रोडक्ट्स वापरतात. पण त्वचेनुसार स्किन केअर रुटीन फॉलो करावे असा सल्ला दिला जातो.
Image credits: pinterest
Marathi
कोरफड
कोरफडमुळे त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते. यामधील अँटीऑक्सिडेंट गुणधर्म त्वचेला फ्री रेडिकल्सपासून बचाव करतात. यामुळे अँटी-एजिंगच्या समस्येपासून दूर राहता.
Image credits: social media
Marathi
लिंबाचा रस
लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचेला ग्लो येण्यास मदत होते. याशिवाय त्वचेवरील डाग, सुरकुत्याही कमी होतात.
Image credits: Pinterest
Marathi
चंदन पावडर
चंदनच्या पावडरमुळे त्वचेला थंडावा मिळतो. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात विशेषकरुन याचा वापर करावा. याशिवाय चंदनच्या पावडरमुळे त्वचेवर जळजळ आणि रॅशेजसारख्या समस्या दूर होतात.
Image credits: Social Media
Marathi
मध
मधामुळे त्वचेमध्ये ओलसरपणा टिकून राहण्यास मदत होते. यामधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्सच्या समस्येपासून बचाव करते.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.