तिळामध्ये प्रोटीन, फायबर, निरोगी फॅट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्न यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात.
तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे असतात. ही खनिजे हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खूप मदत करतात.
तिळामध्ये असलेले फायबर पचनसंस्था सुरळीत ठेवते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.
संतुलित आहारासोबत तीळ खाल्ल्यास त्यातील अनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
तिळातील फायबर, फॅट्स आणि प्रोटीन रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखतात आणि ती नियंत्रणात ठेवतात.
तीळ आरोग्यासाठी चांगले असले तरी ते मर्यादित प्रमाणातच खावेत. तुम्ही तिळाची चटणी, लाडू, पावडर किंवा सॅलड आणि भाजीतून त्याचा आहारात समावेश करू शकता.
Gold Earrings : 3 ग्रॅममध्ये मिळणारे सुंदर इअररिंग्स, सगळे पाहतच राहतील
Lemon For Dandruff : लिंबू आणि खोबरेल तेलाचा हा सोपा उपाय, कोंडा होईल छुमंतर
Warm Water : जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्यास काय होते माहितीये का?
Breastfeeding Diet : स्तनदा मातांनी आहारात नक्की घ्यावेत हे ७ पदार्थ