हिवाळ्यात काळ्या तिळाचे लाडू खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते. यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात. हे फायबर समृद्ध आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
कढईत तीळ मंद आचेवर भाजून घ्या. तिळाचा वास आणि तडतड सुरू झाल्यावर गॅस बंद करा. नंतर शेंगदाणे भाजून, थंड करून त्याची साल काढा.
कढईत तूप टाकून त्यात किसलेला गूळ घालून मंद आचेवर वितळवून घ्या. गूळ जास्त शिजवणे टाळा
वितळलेल्या गुळात भाजलेले तीळ आणि शेंगदाणे घालून चांगले मिक्स करावे. मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताला तूप लावून छोटे लाडू बनवा.
लाडू हवाबंद डब्यात ठेवा. हे लाडू 10-15 दिवस ताजे राहतात. रोज एक ते दोन लाडू खा. हिवाळा तुम्हाला जाणवणारही नाही.