Marathi

कृति सेननच्या 7 ट्रेंडी हेअरस्टाइल्स

बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन तिच्या अभिनयासोबतच फॅशन आणि स्टायलिंगसाठीही ओळखली जाते. तिच्या या 7 हेअरस्टाइल्स पाहून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता.
Marathi

हाय मेसी बन आणि साईड टेंड्रिल्स

कृतिचा हा 'हाय मेसी बन' तुम्हाला एकदम 'बॉसी लेडी' लूक देईल. यामध्ये केसांना व्हॉल्यूम देऊन डोनटच्या मदतीने वर टाय केले आहेत चेहऱ्यावर केसांच्या बटा काढल्या आहेत. 

Image credits: INSTAGRAM
Marathi

फ्रंट फ्रेमिंग हेअरस्टाईल

तुमचे केस लहान असोत किंवा लेझर कट, कृतीसारखं मधोमध भांग पाडून दोन्ही बाजूंना वेणी घालून पफी लूक दिला आहे. ही हेअरस्टाईल एथनिक, वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर छान दिसते.

Image credits: INSTAGRAM
Marathi

ब्रेडेड टियारा ब्रेड

‘ब्रेडेड टियारा’त केसांचे अनेक भाग करून त्यांना क्रॉस साईडमध्ये जोडले जाते. सोबत एक साधी वेणी या लूकला अधिक आकर्षक बनवते. तुम्हीही ही स्टाईल नक्की ट्राय करा.

Image credits: INSTAGRAM
Marathi

ट्विस्टेड लो बन

 'ट्विस्टेड लो बन' ही ट्राय करू शकता. केस मागे खेचून, बाजूने पफ तयार करून अंबाडा घाला. तुम्ही हा बन साधा ठेवू शकता किंवा फुलांनी सजवून अधिक सुंदर बनवू शकता.

Image credits: INSTAGRAM
Marathi

फ्लॅट रिब्ड बॅक हेअर

जर तुम्हाला मोकळे केस ठेवायला आवडत असतील, तर केसांना दोन भागांमध्ये विभागून, लहान लहान बटा घेऊन मागे क्लिप लावा. उरलेले केस स्ट्रेट करा. सेट करण्यासाठी पावडर, हेअर स्प्रे वापरा

Image credits: INSTAGRAM
Marathi

साईड फ्लफी हेअर

'साईड फ्लफी हेअर' स्टाईल नेहमीच आकर्षक दिसते. केसांना दोन्ही बाजूंनी भांग पाडून कडेला पफ तयार करा. उरलेल्या केसांना कर्ल करा. या लूकवर चांदबाली घातल्यास लूक अधिकच खुलून दिसेल.

Image credits: INSTAGRAM
Marathi

मेसी ब्रेड हेअरडू

पार्टी किंवा फंक्शनसाठी 'मेसी ब्रेड' नक्की ट्राय करा. यामुळे तुमचा चेहरा भरलेला दिसतो आणि एक स्टायलिश लूक मिळतो. यासोबतच चेहऱ्यावरील मॅचिंग कर्ल्स तुमचा लूक पूर्ण करतील.

Image credits: INSTAGRAM

Jewellery: 7 कलरफुल डिझाइन्स, प्रत्येक आऊटफिटला देतील नवा लुक!

Jewellery: GenZ मुलींसाठी खास कुंदन चोकर नेकलेस, पाहा लेटेस्ट डिझाइन्स

Fashion Tips: पावसाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी एव्हरग्रीन सिल्क साड्या

Jewellery: रंगीबेरंगी बीडेड पैंजण पायांना देतील गॉर्जियस लूक