Marathi

सोने खरेदी करताय? जाणुन घ्या किती स्वस्त झाले सोने

Marathi

आठवडाभरात जवळपास १००० रुपयांनी स्वस्त झाले सोने

एका आठवड्यात सोने जवळपास १००० रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ही चांगली संधी आहे.

Image credits: freepik
Marathi

७६,७४० रुपये प्रति ग्रॅम सुरू आहे सोन्याचा भाव

IBJA नुसार गेल्या शनिवारी २२ नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव ७७,७८७ वर होता, जो आता ७६,७४० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. म्हणजेच आठवडाभरात सोने १०४७ रुपयांनी स्वस्त झाले.

Image credits: Getty
Marathi

११ महिन्यात १३,४०० रुपयांनी महाग झाले सोने

गेल्या ११ महिन्यात सोने १३,४०० रुपयांनी महाग झाले आहे. १ जानेवारी २०२४ रोजी सोन्याची किंमत ६३,३५२ रुपये होती. जी आता ७६,७४० रपये झाली आहे.

Image credits: freepik
Marathi

वर्ष अखेरपर्यंत ८५ हजारांपर्यंत जावू शकतो सोन्याचा भाव

तज्ञांच्या मते, वर्ष अखेरपर्यंत सोन्याचा भाव ८५,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहचू शकतो. लग्न सराई सुरू झाल्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.

Image credits: Freepik
Marathi

सोन्याचा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव काय?

३० ऑक्टोबर २०२४ रोजी सोन्याने आतापर्यंतचा सर्वाधिक भाव गाठला होता. तेव्हा सोने ७९,६८१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले होते.

Image credits: Getty
Marathi

आठवडाभरात किती स्वस्त झाली चांदी

आठवडाभरात चांदी १५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. गेल्या शनिवारी म्हणजेच २२ नोव्हेंबर रोजी चांदी ९०,८५० रुपयांवर होती, जी आता ८९,३८३ रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे.

Image credits: Pinterest
Marathi

११ महिन्यांत १६००० रुपयांनी महाग झाली चांदी

चांदी मागील ११ महिन्यात १५,९८८ रुपयांनी महाग झाली आहे. १ जानेवारी २०२४ रोजी चांदी ७३,३९५ रुपयांवर होती, जी आता वाढून ८९,३८३ रुपये प्रति किलोग्राम झाली आहे

Image credits: Pinterest
Marathi

चांदीचा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव किती?

चांदीचा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव २३ ऑक्टोबर २०२४ रोजी ९९,१५१ रुपये इतका होता

Image credits: social media

बॅकलेस लूकला द्या नवा ट्विस्ट, बनवा अनन्या पांडे सी 8 हेअरस्टाईल!

मुलांना हट्टी बनवणाऱ्या 8 सवयी, पालकांनी द्यावे लक्ष

लसूण-कांदा खाल्ल्याने पाप लागते का? प्रेमानंद महाराज काय सांगतात?

हिवाळ्यात तिळ खाण्याचे 6 आरोग्यदायी फायदे, हाडांसोबत त्वचेला द्या ताकद