रोज आल्याचं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे, वजनही राहिल नियंत्रणात
Lifestyle Sep 08 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
रोज आल्याचं पाणी पिण्याचे फायदे!
रोज सकाळी गरम पाण्यात आलं घालून प्यायल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. ते फायदे नेमके कोणते आहेत, ते इथे जाणून घेऊया.
Image credits: Getty
Marathi
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
आल्याचं पाणी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शन्सशी लढायला मदत मिळते.
Image credits: Getty
Marathi
सर्दी-तापावर गुणकारी
सर्दी, ताप यांसारख्या ऋतू बदलामुळे होणाऱ्या आजारांवर आल्याचं पाणी खूप फायदेशीर ठरतं.
Image credits: instagram
Marathi
पचनक्रिया सुधारते
आल्याचं पाणी पचनाच्या समस्या दूर करतं. बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि मळमळ यांसारख्या त्रासांपासून आराम मिळतो.
Image credits: Getty
Marathi
वजन कमी करण्यास मदत
जे लोक वजन कमी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी आल्याचं पाणी एक उत्तम पर्याय आहे. हे शरीरातील चरबी कमी करतं आणि भूक नियंत्रणात ठेवायला मदत करतं.
Image credits: Getty
Marathi
मासिक पाळीतील वेदना कमी होतात
सांधेदुखी, स्नायूदुखी आणि मासिक पाळीच्या काळात होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी आल्याचं पाणी मदत करतं.
Image credits: Getty
Marathi
गरोदरपणातील मळमळ कमी होते
गरोदरपणात होणारी मळमळ कमी करण्यासाठी आलं उपयुक्त आहे. तसेच, गर्भाशयाच्या आकुंचनाला कारणीभूत ठरणारे 'प्रोस्टाग्लँडिन' रोखून जास्त रक्तस्राव नियंत्रणात आणण्यासही मदत करते.
Image credits: Getty
Marathi
घशाच्या खवखवीवर आराम
घशातील खवखव आणि सूज कमी करण्यासाठी आल्याचं पाणी मदत करतं. घसा दुखत असल्यास हे एक चांगलं औषध आहे.