हे एक खास पेय आहे, जे तुम्ही रोजच्या सवयीत आणल्यास तुमच्या किडनीचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
किडनीच्या आरोग्यासाठी आल्याचा चहा सर्वोत्तम मानला जातो. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
आल्यामध्ये 'जिंजेरॉल' (gingerol) नावाचा सक्रिय घटक असतो. यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे किडनीवरचा ताण कमी व्हायला मदत होते.
काही अभ्यासांनुसार, आलं युरिया आणि क्रिएटिनिनची पातळी सुधारण्यास मदत करतं. हे दोन्ही घटक किडनी शरीरातून बाहेर टाकण्यासाठी फिल्टर करत असते.
आल्याचा चहा प्यायल्याने पोट फुगणे, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या कमी होतात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
आल्याचा चहा योग्य प्रमाणात प्यायल्यास रक्तदाब (Blood Pressure) आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
आल्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. यामुळे सर्दी, फ्लू यांसारख्या सामान्य आजारांपासून बचाव होतो.
आल्याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत होते.
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आणि ग्लायसेमिक कंट्रोल सुधारण्यास आलं मदत करतं.
मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना आणि पोटदुखी कमी करण्यासाठी आल्याचा वापर केला जातो.
1 ग्रॅम सोन्यातील जबरदस्त अंगठ्यांचे डिझाइन्स
साडीवर फक्त एक राणीहार घाला आणि मिळवा आकर्षक लूक
डार्क सर्कल्सना म्हणा गुडबाय! हे आहेत 6 सोपे घरगुती उपाय
Tulsi Plant : तुमच्या घरातलं तुळशीचं रोप अचानक सुकलंय? हे आहेत घरात संकट येण्याचे संकेत