पपईमध्ये कॅरोटीन आणि पपेन एन्झाइम भरपूर प्रमाणात असते. हे घटक गर्भाशयाचे आकुंचन वाढवतात. यासोबतच ते इस्ट्रोजेनची पातळीही योग्य ठेवतात.
अननसात 'ब्रोमेलेन' नावाचे एन्झाइम असते. हे एन्झाइम गर्भाशयाचे अस्तर मऊ करते. तसेच शरीरातील रक्तप्रवाह वाढवण्यासाठीही हे खूप फायदेशीर ठरते.
आलं शरीरात उष्णता निर्माण करते आणि रक्तप्रवाह वाढवते. तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता. किंवा गुळासोबतही तुम्ही आल्याचे सेवन करू शकता.
हळद हार्मोन्सचे संतुलन राखते. यामुळे ओटीपोटातील स्नायूंचा ताण कमी होतो. तुम्ही गरम दूध किंवा गरम पाण्यात हळद मिसळून पिऊ शकता.
तीळ ओटीपोटात रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करतात. तुम्ही तिळाचे लाडू बनवून खाऊ शकता. पाळी लवकर येण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो.
संत्री, लिंबू आणि किवी यांसारखी लिंबूवर्गीय फळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी नियंत्रित करतात. पाळी लवकर येण्यासाठी तुम्ही ही फळे खाऊ शकता.
Necklace Designs : सिल्क साडीवर असा एकच हेवी नेकलेस देईल ग्रँड लूक
हेवी डिझाईनचे चांदीचे पैंजण, पायांचे सौंदर्य आणखी वाढवतील!
Blouse Designs : साध्या साडीलाही ग्रँड लूक देतील हे ट्रेंडी ब्लाऊज डिझाईन्स
Patiala Suits : पाहताच प्रेमात पडाल, पाहा हे ब्युटीफुल पटियाला सूट्स!