बहुतांशजणांना सकाळी दूध पिण्याची सवय असते. पण उपाशी पोटी दूध प्यावे का असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो.
दूधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन असते. यामुळे आरोग्याला फायदा होऊ शकतो. पण दूध पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहिती आहे का?
आयुर्वेदानुसार, सकाळी उपाशी पोटी दूध पिणे योग्य नाही. यामुळे काहींना पचनास समस्या होऊ शकते. याशिवाय गॅस्ट्रिकची समस्याही वाढली जाऊ शकते.
अॅसिडिटीची समस्या असल्यास उपाशी पोटी दूध पिणे टाळा. यामुळे पोटात जळजळ आणि गॅस होऊ शकतो.
पचनक्रिया कमजोर असणाऱ्या व्यक्तींनी सकाळी उपाशी पोटी दूधाचे सेवन करणे टाळावे. यामुळे गॅस, सूज येणे आणि मळमळ अशी समस्या उद्भवू शकते.
सर्दी-खोकला असल्यास उपाशी पोटी दूधाचे सेवन करणे टाळावे. यामुळे कफची समस्या वाढली जाऊ शकते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.