जिम करण्यापूर्वी घेतलेला आहार तुमच्या व्यायामात महत्त्वाची भूमिका बजावतो. तो ऊर्जा देणारा, पचनास सोपा आणि पोषक असावा, जेणेकरून तुमच्या शरीराला व्यायामादरम्यान आवश्यक ऊर्जा मिळेल.
जिम करण्याच्या 1-2 तास आधी हलका आहार घ्या, जो पचनास सोपा असेल. जिम करण्याच्या अगदी 30-45 मिनिटे आधी छोटासा स्नॅक (लघु आहार) घेऊ शकता.
जिम करण्यापुर्वी कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन युक्त आहार घ्यावा. तसेच फायबर आणि फॅट युक्त आहार कमी प्रमाणात घ्यावा.
जिम पुर्वी केळं, सफरचंद , संत्री यासारखी फळं, ओट्स, ब्रेड स्लाइससोबत पीनट बटर किंवा अंडं, सुकामेवा, योगर्ट, प्रोटीन शेक, अंडी यांचा आहारात समावेश करता येईल.
1. केळं: झटपट ऊर्जा देते.
2. एक मुठ ड्राय फ्रूट्स: झटपट ऊर्जा आणि प्रोटीनसाठी.
3. डार्क चॉकलेटचा तुकडा: कमी प्रमाणात.
4. कोमट पाण्यात मध: हलकी ऊर्जा देते.
जिमपूर्वी काही वेळ आधी 1-2 ग्लास पाणी प्या, पण जास्त प्रमाण टाळा, जेणेकरून वर्कआउटदरम्यान अस्वस्थ वाटणार नाही.
• तळलेले, फॅटयुक्त किंवा जड पदार्थ.
• खूप मसालेदार आणि फायबरयुक्त पदार्थ.
• जिमपूर्वी कधीही उपाशी पोटी व्यायाम करू नका.
तुमच्या शरीराची पचनक्रिया आणि व्यायामाची पातळी लक्षात घेऊन आहार ठरवा. एकदा डाएटिशियनचा सल्ला घ्या. या स्टोरीतून केवळ माहिती सांगितली आहे. हा डाएट प्लॅन सर्वांना लागू होत नाही.