मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू का खातात, त्याचे काय आहेत फायदे
Lifestyle Jan 07 2025
Author: vivek panmand Image Credits:Freepik
Marathi
1. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते
हाडे मजबूत होण्यासाठी तिळाचे लाडू उपयुक्त आहेत. नियमित सेवन केल्याने हाडांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
Image credits: our own
Marathi
2. तिळामध्ये असलेले नैसर्गिक तेल
तिळामध्ये असलेले नैसर्गिक तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी पोषक असते. थंड हवामानात कोरडी त्वचा आणि केसांसाठी तिळाचे सेवन फायदेशीर ठरते.
Image credits: our own
Marathi
३. शरीराला ऊर्जा देते
तिळाचे लाडू शरीराला त्वरित ऊर्जा देतात. थंडीत उष्णतेची गरज भागवण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.
Image credits: our own
Marathi
४. पचनक्रिया सुधारते
तिळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
Image credits: our own
Marathi
५. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
तिळामध्ये असलेले हेल्दी फॅट्स (मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स) हृदयासाठी फायदेशीर आहेत आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवतात.
Image credits: our own
Marathi
६. प्रतिकारशक्ती वाढवते
तिळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि झिंकसारखे पोषक घटक असतात, जे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.
Image credits: our own
Marathi
लाडू खाण्याची परंपरा आरोग्याला पोषक
मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू खाण्याची परंपरा आरोग्याला पोषक ठरणारी आहे. मात्र, प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे, कारण त्यात गूळ आणि साखरेचे प्रमाण जास्त असते.