हिवाळ्यात गाजर खाणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते. गाजरात व्हिटॅमिन्स आणि पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात. या स्टोरीतून गाजर हलव्याची सोपी रेसिपी जाणुन घेऊयात.
ताज्या गाजरांचा वापर करून त्यांना स्वच्छ धुऊन साल काढा आणि बारीक किसून घ्या.
एका खोलगट पातेल्यात दूध गरम करून उकळायला ठेवा. त्यात किसलेली गाजर टाका आणि मध्यम आचेवर शिजवा. अधूनमधून ढवळत रहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
गाजर दूधात शिजून दूध आटेपर्यंत शिजवा. यामुळे गाजर मऊ होईल आणि गोडसर स्वाद येईल.
आता त्यात साखर घालून नीट मिसळा. साखर विरघळल्यावर तूप घाला आणि गाजर परतून घ्या. यामुळे हलवा चमकदार आणि स्वादिष्ट होतो.
अधिक स्वादासाठी खवा घालून हलक्या हाताने ढवळा.
शेवटी त्यात वेलची पावडर आणि चिरलेले काजू, बदाम, पिस्ते घालून हलवून घ्या.