रोजच्या आहारात दही खाल्ल्याने आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊया दह्याचे आरोग्यदायी गुणधर्म.
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स (चांगले बॅक्टेरिया) असतात. हे प्रोबायोटिक्स पोट फुगण्याची समस्या कमी करतात आणि पोटाशी संबंधित इतर आजार टाळण्यास मदत करतात.
दही कॅल्शियम आणि फॉस्फरसने परिपूर्ण असते. यामुळे हाडांची घनता वाढते आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या आजाराचा धोका कमी होतो.
दह्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीर संसर्गाशी लढण्यासाठी अधिक सक्षम बनते.
दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. परिणामी, अवेळी लागणारी भूक आणि अरबट-चरबट खाण्याची इच्छा कमी होते.
दह्यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. तसेच, दह्यातील पोषक तत्वे केसांच्या मुळांना पोषण देऊन डोक्यातील कोंडा कमी करतात.
नियमितपणे दही खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होते. तसेच, रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते.
Strong Bones : हाडं मजबूत करायची आहेत? मग आहारात 'या' 8 पदार्थांचा समावेश करा
ऑलिव्ह ऑईलने खरंच चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं? जाणून घ्या ७ जबरदस्त फायदे
स्टाईल आणि आराम दोन्हीसाठी बेस्ट आहेत हे कॉटन नाईटी डिझाइन्स
मखाणे खाण्याचे ७ जबरदस्त फायदे; आरोग्यासाठी आहे एक वरदान