ऑलिव्ह ऑईल म्हणजेच जैतुनाचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला पाहूया, रोजच्या आहारात या तेलाचा समावेश केल्यास शरीराला कोणते फायदे मिळतात.
ऑलिव्ह ऑईलमध्ये हेल्दी फॅट्स असतात. हे फॅट्स शरीरातील 'खराब' कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतात आणि 'चांगले' कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यासाठी मदत करतात.
ऑलिव्ह ऑईल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते, ज्यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोका खूप कमी होतो.
नियमित ऑलिव्ह ऑईल खाल्ल्याने मज्जासंस्थेचे आरोग्य चांगले राहते. हे वाढत्या वयामुळे विचार करण्याची शक्ती कमी होण्यापासून बचाव करण्यासही मदत करू शकते.
ऑलिव्ह ऑईल एक नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. ते कोरड्या त्वचेला ओलावा देते आणि त्वचेचा नैसर्गिक संरक्षक थर पुन्हा ताजातवाना करते.
अनेकांना वाटते की तेल खाल्ल्याने वजन वाढते, पण ऑलिव्ह ऑईल वजन कमी करण्यासही मदत करू शकते. यामधील हेल्दी फॅट्स या कामात मदत करतात.
ऑलिव्ह ऑईल हाडांना सुरक्षित ठेवण्यास मदत करते. यातील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म हाडांची होणारी झीज रोखू शकतात.
स्टाईल आणि आराम दोन्हीसाठी बेस्ट आहेत हे कॉटन नाईटी डिझाइन्स
मखाणे खाण्याचे ७ जबरदस्त फायदे; आरोग्यासाठी आहे एक वरदान
दुपारची कढी संध्याकाळपर्यंत आंबट होते? शेफची ही 1 सोपी ट्रिक वापरा
Asafoetida : रोज चिमूटभर हिंग खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या फायदे