पावसाळ्यात संक्रमक रोग होण्याची शक्यता जास्त असते. आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
पावसाळ्यात सामान्यतः काही आजार जास्त प्रमाणात आढळतात. असे कोणते आजार आहेत आणि त्यांना प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना पुढे सांगितल्या आहेत.
दिवसा चावणारे एडीस डासांमुळे डेंग्यू पसरतो.
घरांच्या आणि इमारतींच्या आत आणि परिसरातील साचलेल्या पाण्यात अंडी घालून एडीस डास वाढतात.
साचलेल्या पाण्यात सामान्यतः डास वाढतात. हे डास प्रामुख्याने चिकनगुनिया होण्यास कारणीभूत असतात.
घरातून आणि परिसरातून साचलेले पाणी काढून डासांना दूर ठेवणे हा चिकनगुनिया प्रतिबंधाचा सर्वोत्तम मार्ग आहे.
एनोफिलीस मादी डासामुळे मलेरिया होतो. पावसाळ्यात सर्वात सामान्य आजारांपैकी एक मलेरिया आहे.
ताप, थंडी वाजणे, स्नायू दुखणे, अशक्तपणा ही मलेरियाची प्रमुख लक्षणे आहेत.
तुमच्या घरातील पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे हा मलेरिया प्रतिबंधाचा सर्वोत्तम मार्ग आहे.
टायफॉइड हा एक जलजन्य आजार आहे. अस्वच्छतेमुळे हा आजार होतो. अस्वच्छ वातावरणात तयार केलेले अन्न आणि पाणी पिण्याने टायफॉइड होऊ शकतो.
व्हायरल ताप हा एक सामान्य आजार आहे. परंतु पावसाळ्यात तो जास्त प्रमाणात आढळतो. तीव्र ताप, सर्दी, खोकला ही व्हायरल तापाची काही सामान्य लक्षणे आहेत.
लेप्टोस्पायरोसिस हा आणखी एक आजार आहे. या आजाराचे वाहक केवळ उंदीरच नाहीत तर कुत्रे आणि इतर पाळीव प्राणी, गुरांपैकी प्राणी देखील आहेत.
हातापायांना जखमा असताना साचलेल्या पाण्यात उतरणे हा आजार पसरण्यास कारणीभूत ठरू शकते, म्हणून ते टाळले पाहिजे.