पहाटे 4-6 दरम्यान उठल्यास मन ताजेतवाने आणि ऊर्जावान राहते. दिवसाची चांगली सुरुवात केल्याने निर्णयक्षमता सुधारते. सकाळी अभ्यास, ध्यान आणि योजना आखण्यासाठी सर्वोत्तम वेळ असते.
Image credits: Getty
Marathi
नेहमी ज्ञान मिळवत राहा
दररोज नवीन गोष्टी शिकण्याची सवय लावा. चांगली पुस्तके, प्रेरणादायी व्यक्तींचे विचार आणि ऐतिहासिक अनुभव यांचा अभ्यास करा. जेवढे ज्ञान वाढेल, तेवढे निर्णय योग्य होतील.
Image credits: adobe stock
Marathi
वेळेचा योग्य उपयोग करा
वेळेचे योग्य नियोजन केल्यास यशाची संधी वाढते. आळशीपणा टाळा आणि दररोजच्या कामांचे वेळापत्रक ठरवा. वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी (social media, TV) टाळा.
Image credits: adobe stock
Marathi
शत्रू आणि मित्र यांना ओळखा
नेहमी लोकांची पारख करा, प्रत्येक मित्र असतोच असे नाही. खोट्या आणि द्वेष करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कोणतेही मोठे निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचला.
Image credits: Getty
Marathi
आर्थिक नियोजन शिका
गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका, पैसा व्यवस्थित वापरा. प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टींसाठी गुंतवणूक करण्याची सवय लावा. संकटसमयी पैसा उपयोगी पडतो, त्यामुळे नेहमी काही रक्कम बाजूला ठेवा.