तुम्ही वेळेवर जेवण करायला हवे. जेवण टाळल्यास ब्लड शुगर लेव्हल बिघडते आणि त्वचेचे नुकसान होते. वेळेवर खाल्ल्याने तुमची त्वचा निरोगी राहते.
तुमच्या आहारात रंगीबेरंगी भाज्यांचे प्रमाण जास्त असावे. यातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवतात आणि चेहऱ्यावर चांगला ग्लो आणतात.
ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असलेली धान्ये आणि डाळी जास्त खाव्यात. हे पदार्थ ब्लड शुगर वाढू देत नाहीत आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करतात.
आहारात मासे, अक्रोड, चिया आणि जवस यांचा समावेश करा. यातील ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करतात.
फळांचा रस पिण्याऐवजी थेट फळे खा. फळांमध्ये असलेले फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारतात.
साखर, कोल्ड्रिंक्स आणि मैद्याच्या पदार्थांपासून दूर राहा. हे पदार्थ ब्लड शुगर वाढवतात, ज्यामुळे चेहऱ्यावर जास्त पिंपल्स येतात.
नट्स, बिया आणि ॲव्होकॅडो फळे खा. यातून मिळणारे पोषक घटक त्वचेला ओलावा देतात आणि त्वचा अधिक मजबूत बनवतात.
Hair Care : लांबसडक केसांचं रहस्य उलगडलं, घरीच तयार करा हे खास तेल
Gold Necklace Designs : अर्ध्या तोळ्यात मिळणाऱ्या आकर्षक नेकलेस डिझाईन्स
Glowing Skin : चमकदार त्वचेसाठी कॉफीचे 5 सोपे ब्युटी हॅक्स
Cardamom Water : रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे माहिती आहेत का?