Marathi

चमकदार त्वचेसाठी कॉफीचे ५ सोपे ब्युटी हॅक्स

Marathi

कॉफी स्क्रब

१. कॉफी स्क्रब: कॉफी पावडरमध्ये मध किंवा दही मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी (डेड स्किन) निघून जातात आणि त्वचा मऊ होते.

Image credits: Getty
Marathi

कॉफी आणि मध

कॉफी पावडरमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटांनंतर धुवून टाका. हा पॅक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतो आणि चेहऱ्याला फ्रेश लुक देतो.

Image credits: Getty
Marathi

कॉफी आणि दह्याचा पॅक

कॉफी पावडरमध्ये दही मिसळून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचा मऊ करते आणि चेहऱ्याला एकसमान रंग उजळण्यास मदत करते.

Image credits: Getty
Marathi

कॉफी आणि कोरफड (अ‍ॅलोवेरा)

कॉफी पावडरमध्ये अ‍ॅलोवेरा जेल मिसळून चेहऱ्यावर लावा. कोरफड त्वचेला थंडावा आणि ओलावा देते, ज्यामुळे तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल.

Image credits: Getty
Marathi

कॉफी आईस क्यूब्स

तयार केलेली ब्लॅक कॉफी थंड करा आणि त्याचे आईस क्यूब्स बनवा. हे क्यूब्स एका सुती कपड्यात गुंडाळून चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा. यामुळे त्वचेला थंडावा आणि ताजेतवाने वाटते.

Image credits: Getty

Cardamom Water : रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे माहिती आहेत का?

Gold Jhumka Designs : सिल्क साड्यांवर शोभून दिसतील असे सुंदर झुमके

Antique Gold Bangles : हातांना रॉयल लूक देणाऱ्या अँटिक गोल्ड आणि मोत्यांच्या बांगड्या

Cracked Heels Remedy : पायांच्या भेगा घालवण्यासाठी काय करावे? वाचा घरगुती उपाय