चमकदार आणि नितळ त्वचेसाठी असे तयार करा Beetroot Serum
Lifestyle Mar 20 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
ग्लोइंग त्वचेसाठी उपाय
आपली त्वचा हेल्दी आणि नितळ राहण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतो. पण घरच्याघरी काही गोष्टींचा वापर करुन चेहऱ्यावर नॅच्युरल ग्लो येऊ शकतो.
Image credits: social media
Marathi
बीटाचे सीरम
नॅच्युरल प्रोडक्ट्सच्या मदतीने चेहऱ्यावर ग्लो येण्यासह त्वचेसंबंधित समस्याही दूर होतात. अशातच घरच्याघरी बीटापासून सीरम कसे तयार करायचे हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
या गोष्टींची आवश्यकता
बीटाचा सीरम तयार करण्यासाठी 1 बीट, 2 चमचे एलोवेरा जेल, 1 चमचा ग्लिसरीन आणि 2 व्हिटॅमिन ई चे कॅप्सूल घ्या.
Image credits: Pinterest
Marathi
बीटाचा ज्यूस तयार करा
सर्वप्रथम बीट स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करा. यानंतर बीट मिक्सरमध्ये वाटून घ्या.
Image credits: Pinterest
Marathi
सामग्री मिक्स करा
बीटाचा ज्यूस गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये ग्लिसरीन, एलोवेरा जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून सर्व सामग्री एकत्रित मिक्स करा.
Image credits: Pinterest
Marathi
काचेच्या बॉटलमध्ये भरा
बीटाचे सीरम तयार केल्यानंतर काचेच्या बॉटलमध्ये भरुन ठेवा. यानंतर दररोज रात्री चेहऱ्याला लावा.
Image credits: Pinterest
Marathi
असे लावा सीरम
रात्री झोपण्यापूर्वी फेसवॉश करा. यानंतर सीरमचे काही ड्रॉप्स चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्याला नॅच्युरल ग्लो येण्यास मदत होईल.
Image credits: Pinterest
Marathi
डागांची समस्या होईल दूर
बीटाच्या सीरमचा वापर केल्यास त्वचेवरील डागांची समस्या दूर होण्यास मदत होईल. याशिवाय टॅनिंगही निघून जाईल.
Image credits: pinterest
Marathi
सुरकुत्या दूर होतील
चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या समस्येपासून सुटका मिळवायची असल्यास बीटाचे सीरम लावू शकता.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.