तुमचे केस फ्रिझी असतील तर तुम्ही बबल लूकची हेअरस्टाईल करू शकता. या लूकमध्ये तुमचे केस विस्कटलेले दिसत नाहीत आणि सुंदर दिसतात.
कुरळे आणि फ्रिझी केस सांभाळणं थोडं कठीण असतं. अशा केसांवर तुम्ही 'अप बन' बांधून सुंदर दिसू शकता.
जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव दिसत असतील, तर केसांना थोडं जेल लावून सिल्की बनवा. तुम्ही हाफ पोनीटेल बांधून केस अधिक व्यवस्थित दाखवू शकता.
लांब आणि फ्रिझी केस व्यवस्थित दिसावेत यासाठी तुम्ही हाय पोनीटेल बांधू शकता. यासोबत ड्रॉप इअररिंग्स घातल्यास लूक आणखी छान दिसेल.
मोकळ्या केसांमध्ये एका बाजूचे केस सांभाळण्यासाठी तुम्ही साईड ब्रेड (वेणी) घालू शकता. अशी वेणी दिसायला खूपच स्टायलिश वाटते.
लांब वेणी घालून तुम्ही फ्रिझी केस मॅनेज करू शकता. हवं असल्यास तुम्ही हेअर ॲक्सेसरीजचा वापरही करू शकता.
महिला दिनी मुलीला द्या या 10 ग्रॅम चांदीच्या 'या' वस्तू, होईल खूश
फक्त 30 मिनिटांत बनवा हेल्दी गव्हाच्या पिठाचा केक, वाचा सोपी रेसिपी
जोडव्यांचा हटके ट्रेंड, पाहा ५ ऑक्सिडाइज्ड डिझाइन्स
Fashion Tips: आता ट्रेंड खादी साड्यांचा; ऑफिससाठी मिळेल एलिगंट लूक