चमचाभर बेसनाने चेहऱ्याला टाका उजळून, नवीन वर्षात चेहऱ्यावर येईल ग्लो
सध्या धावपळीच्या काळात चेहऱ्याची काळजी घेणं आवश्यक ठरत असतं. अनेकांना कमी वयातच चेहऱ्यावर डाग, पिंपल्स, सुरकुत्या आणि टॅनिंग पाहायला मिळत असते.
Lifestyle Dec 06 2025
Author: vivek panmand Image Credits:pinterest
Marathi
हिवाळ्यात चेहरा पडतो काळा
हिवाळ्यात चेहरा अनेकांचा काळा पडत असतो. यावेळी उन्हामुळे टॅनिंग पडत असल्याचं लक्षात येत असतं. आपण घरगुती फेस पॅक त्वचेला लावल्यास आपली त्वचा तेजस्वी दिसून येईल.
Image credits: instagram
Marathi
फेस मास्क बनवायची प्रोसेस जाणून घ्या
फेस मास्क बनवायची प्रोसेस अतिशय सोपी असते. २ चमचे बेसन, १ चमचा मुलतानी माती, कॉफी, लिंबाचा रस आणि २ चमचे दही आपल्याला साहित्य लागू शकते.
Image credits: Asianet News
Marathi
सर्व साहित्य एकत्र करून घ्या
आपण सर्व साहित्य एकत्र करून ठेवा. हा फेस मास्क हा आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर आपण लावू शकता. हलक्या हातांनी मसाज करून २० मिनिटे त्याला तसंच राहूद्या. नंतर चेहऱ्याला धुवून काढा.
Image credits: Getty
Marathi
स्वच्छ पाण्याने चेहरा घ्या धुवून
त्यानंतर स्वच पाण्याने चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय केल्यास टॅनिंग कमी होईल. बेसनमुळे आपला चेहरा उजळून निघतो.
Image credits: social media
Marathi
फेस पॅक खर्च कमी करण्याचा करा प्रयत्न
आपण फेस पॅकचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. घरात उपलब्ध असलेल्या घटकांनी हा फेसपॅक आपण तीनदा वापरल्यावर आपल्या चेहऱ्यावर चांगला ग्लो येऊ शकतो.