सध्या प्रत्येकजण केसांच्या समस्येने त्रस्त आहे. अशातच केसांच्या आरोग्यासाठी घरच्याघरी स्पेशल लाडू तयार करू शकता. यामुळे केस मजबूत आणि लांबसडकही होतील.
लाडूसाठी अक्रोड, भोपळ्याच्या बिया, मेथीचे दाणे, अळीव व तीळ 2-3 चमचे घेऊन भाजून घ्या. यामध्ये खिसलेला नारळ, खजूर व दालचिनी पावडरही वाटून घेत सर्व साहित्य एकत्रित करुन लाडू तयार करा.
खजूरमध्ये व्हिटॅमिन बी, लोह आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे केसांना मजबूती मिळण्यास मदत होते.
मेथी दाण्यांमुळे केसांच्या मूळांना येणारी सूज कमी करणे, कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम असते. यामुळे केसांच्या मूळांना पोषण मिळते.
तीळमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडेंट्स असल्याने केसांची वाढ होते.
अळीवच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. यामुळे केसांचे टेक्चर सुधारले जाते. याशिवाय नारळामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
अक्रोडमध्ये बायोटिन आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. यामुळे केसांना मजबूती मिळते. दालचिनीमुळे शरिरातील रक्तपुरवठा सुरळीत होतो.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.