आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक नातेसंबंधावर आपले मत मांडले आहे. त्यांनी सांगितले की अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या जोडीदारासोबतचे नाते आणखी घट्ट करू शकते.
चाणक्यांच्या मते कोणत्याही नात्यात प्रामाणिकपणा व खरे प्रेम हवे. जरी कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल पण प्रामाणिक नसेल तर नात्यात दुरावा येऊ शकतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते अहंकार हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. हे चांगले संबंध खराब करतात. पती-पत्नीमध्ये अहंकार निर्माण झाला तर नाते तुटू शकते.
पती-पत्नीने एकमेकाशी कधीही खोटे बोलू नये. पती-पत्नीच्या नात्यात सत्यता आणि पारदर्शकता असली पाहिजे, असे आचार्य चाणक्य यांचे मत आहे. कारण खोटे बोलल्याने नात्यात गैरसमज निर्माण होतात.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार पती-पत्नीने कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचे ऐकु नये. पती-पत्नी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यात अडकले तर त्यांचा स्वतःचा सुखी संसार उद्ध्वस्त होतो.
या लेखात दिलेली माहिती पूर्णतः सत्य आणि अचूक असल्याचा आम्ही दावा करत नाही. ही माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या